जॉन्सन ॲण्ड जॉन्सन बेबी पावडर विक्रीवरील निर्बंध हायकोर्टाने हटवले

जॉन्सन ॲण्ड जॉन्सन बेबी पावडर विक्रीवरील निर्बंध हायकोर्टाने हटवले

मुंबईः जॉन्सन ॲण्ड जॉन्सन बेबी पावडरच्या विक्रीवरील निर्बंध उच्च न्यायालयाने बुधवारी हटवले. अन्न व औषध प्रशासनाने हे निर्बंध लादले होते.

न्या. गौतम पटेल व न्या. संतोष दिघे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. जॉन्सन ॲण्ड जॉन्सन पावडरचे अकरा ते बारा नमूने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील केवळ दोनच नमून्यांचाच अहवाल निगेटीव्ह आला. अन्य नमून्यांमध्ये दोष आढळला नाही. त्यामुळे जॉन्सन ॲण्ड जॉन्सन पावडर विक्रीवर बंदी घालणे योग्य नाही. अन्न व औषध प्रशासन अशाप्रकारे नमून्यांची चाचणी वारंवार करते याचीही कागदपत्रे सादर झालेली नाहीत. प्रशासनाची ही भूमिका म्हणजे अनागोंदी कारभार असण्याची शक्यता आहे. उत्पादक कसे काम करत असतील हेही स्पष्ट होत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

First Published on: January 11, 2023 4:00 PM
Exit mobile version