ऐन उन्हाळी सुटीत कोकण रेल्वे विस्कळीत

ऐन उन्हाळी सुटीत कोकण रेल्वे विस्कळीत

कोकण रेल्वे मार्गावर ओव्हर हेड वायरच्या दुरुस्तीचे काम करणारी यूटिव्ही मशिन रुळावरून अचानक घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कोकणहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या आणि मुंबईवरून कोकणाच्या दिशेने येणार्‍या गाड्यांचा तब्बल दीड तास खोळंबा झाला. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांंना लेट मार्क लागला. तसेच कोकण रेल्वेवरील प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील भोके गावाजवळ रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाच्या कामासाठी आणलेले यूटिव्ही मशीन मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान रुळावरून घसल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणार्‍या आणि मुंबईवरून येणार्‍या गाड्याच्या रेल्वे मागार्र्वर एकामागोएक अडकून पडल्या होत्या. या गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सुद्धा मोठ्या समस्यांना समोर जावे लागले आहे. या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल एका तासानंतर ही यूटिव्ही मशीन रुळावर आणण्यात अभियांत्रिकी पथकाला यश आलेे. त्यानंतर पूर्ण वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या अनेक रेल्वे गाड्यांना लेट मार्क लागला. या घटनेचे अद्यापही कारण समजू शकले नाही. मात्र कोकण रेल्वे या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर या घटनेचे कारण समजेल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

दीड तास प्रवाशांचे अतोनात हाल
सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु असून कोकणात जाणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. मंगळवारी यूटिव्ही मशीन रुळावर घसरल्यामुळे सुमारे दीड तास कोकण रेल्वेवरील वाहतूक ठप्प होती. भोके गावाजवळची ही घटना घडली. दुपारी दोनच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु झाली. मात्र या मार्गावरील अनेक गाड्या विलंबाने धावत असून कोकण रेल्वेवरील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे कोकण रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

First Published on: May 15, 2019 5:38 AM
Exit mobile version