लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा; आदित्य ठाकरेंची उपस्थिती

लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा; आदित्य ठाकरेंची उपस्थिती

लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा

सेलिब्रिटी आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी ८६ व्या वर्षात पदार्पण केलं. या पाद्यपूजन सोहळ्याला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली. लालबागच्या राज्याच्या पाद्यपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.

लालबागचा राजा म्हणजे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. यंदा लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा २० जून रोजी करण्यात आला. लालबागचा राजा हा मुंबईतला प्रसिध्द गणपती लालबाग परिसरातील मसाला गल्लीमध्ये बसवला जातो. याठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती त्याच ठिकाणी घडवली जाते. पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. दरवर्षी लालबागच्या राज्याच्या मूर्तीचे वेगळे रुप पहायला मिळते यंदाच्या वर्षी राजाचे रुप नेमकं कसं असणार याकडे सर्व भाविकांचे लक्ष लागले आहे. लालबागच्या राजाची मूर्ती संतोष कांबळी आणि त्यांचे कुटुंबिय घडवतात.

लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सहोळा सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले. दरम्यान, ‘प्रत्येक मुंबईकर याठिकाणी येतो तसाच मी आलो आहे. दरवेळी मागायचे नसते कधीकधी आभार ही मानायचे असतात असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसंच माझ्या दोन मागण्या होत्या. राज्य सरकारकडे एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी तुकडी निर्माण करावी आणि महापालिकेचे स्वत:च ट्विटर हँडल सुरू झालं आहे. जिथे तुम्ही तुमच्या समस्या टाकू शकता.’

First Published on: June 20, 2019 5:23 PM
Exit mobile version