Sushama Andhare : नारायण राणे मानसिकरित्या आजारी; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर

Sushama Andhare : नारायण राणे मानसिकरित्या आजारी; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर

मुंबई : राजकारण म्हटलं की, ठाकरे आणि राणे कुटुंबावर सर्वोच्या नजरा असतात. कारण हे दोन्ही कुटुंब एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एक संधी सोडत नाहीत. त्यात आता लोकसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे हे दोन्ही कुटुंब एकमेकांवर गंभीर आरोप करतााना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करताना म्हटले की, उद्धव ठाकरे हे वेडे असून ते आमच्या सुपाऱ्या दहशतवाद्यांना देत होते. नारायण राणेंच्या या आरोपावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Lok Sabha Election 2024 Narayan Rane mentally ill Sushma Andhare response to Uddhav Thackerays criticism)

सुषमा अंधारे मावळमध्ये महविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी देहूरोडमध्ये आल्या होत्या. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंवर टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, नारायण राणे मानसिकरित्या आजारी आहेत आणि आजारी माणसं तापात बडबडतात. त्यामुळे त्यांचं बोलणं कोणीही मनावर घेऊ नये. माझ्या भाच्यांनी प्रचारातून थोडा वेळ काढून नारायण राणेंना एका चांगल्या डॉक्टरांना उपचारासाठी घेऊन जावं. कारण आजारामुळे नारायण राणेंच्या मेंदूवर परिणाम झालेला असू शकतो. दहा वर्ष ज्या काँग्रेसच्या घरात धुणीभांडी करून पदं मिळवली, मात्र आज त्याच गोष्टीचा विसर राणेंना पडला आहे. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशा त्यांना शुभेच्छा, असा शब्दात सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा – Narayan Rane : बाळासाहेबांनी विरोध केला, तिथेच…; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मोदींकडून उघड उघड संविधान बदलण्याची भाषा (Modi change constitution )

भाजपाच्या जाहीरनाम्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, जेवढा जास्त भ्रष्टाचार तेवढा भाजपामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा, ही मोदींची गँरंटी आहे. आज भाजपाने शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील भ्रष्टाचारांना घेऊन स्वत:कडे कचरा जमा केला आहे. तसेच आज मोदींनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणत उघड उघड संविधान बदलण्याची भाषा केली आहे, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचा – BJP Manifesto : भाजपाच्या जे पोटात तेच ओठात; संविधान बदलण्याच्या मनोदयावरून मविआने घेरलं

First Published on: April 14, 2024 5:06 PM
Exit mobile version