घररायगडNarayan Rane : बाळासाहेबांनी विरोध केला, तिथेच...; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Narayan Rane : बाळासाहेबांनी विरोध केला, तिथेच…; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्वव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत, अशी टीका केली होती. याच टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सिंधुदुर्ग : राजकारण म्हटलं की, ठाकरे आणि राणे कुटुंबावर सर्वोच्या नजरा असतात. कारण हे दोन्ही कुटुंब एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एक संधी सोडत नाहीत. त्यात आता लोकसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे हे दोन्ही कुटुंब एकमेकांवर गंभीर आरोप करतााना दिसत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्वव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत, अशी टीका केली होती. याच टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray goes to kneel where Balasaheb opposed Narayan Ranes criticism)

उद्धव ठाकरे याचं डोकं ठिकाणावर नाही, म्हणून देशाच्या नेत्यांवर खंडणीखोर म्हणून टीका करत आहे. पण कोण खंडणी घेत होता आणि कुठल्या रूममध्ये घेत होता, याचा साक्षीदार मी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम केलं आहे. बाकी त्यांना काही उद्योगधंदा नाही. जे 40 आमदार सोडून गेले ते पोच करत होते. उद्धव ठाकरे फोन करायचे आणि तीन लाख रुपये घ्यायचे, त्यांच्याएवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP Manifesto : भाजपाच्या जे पोटात तेच ओठात; संविधान बदलण्याच्या मनोदयावरून मविआने घेरलं

नोटीस आली की उद्धव ठाकरे मोदींच्या दारी (Notice came that Uddhav Thackeray Modi’s door)

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना कुठलीही नोटीस आली की, ते मोदींच्या दारी जायचे. सुशांत सिंह आणि दिशा सालियान केसमध्ये ते किती तरी वेळा मोदींना भेटले आहेत, पण ते आता ती गोष्ट विसरले आहेत. त्यांच्या डोक्यावर परिमाण झाला, असं मी बोलणार नाही. पण ते काहीही बोलत असतील तर त्यांना ते भोगावं लागेल.

- Advertisement -

उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे गुडघे टेकतायत (Uddhav Thackeray kneels before Congress)

बाळासाहेब हिंदुत्व, अभिमान आणि त्याग करणारे होते. पण उद्धव ठाकरे नकली असून ते वडिलांच्या नावावर कर्तृत्व मिळवल्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, तिथे उद्धव ठाकरे गुडघे टेकायला जात आहेत. उद्धव ठाकरे यांचे पाच खासदार असूनही ते मोदींवर टीका करतात, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.

हेही वाचा – Congress on BJP Manifesto : संकल्पपत्राचे नाव माफीनामा पाहिजे; काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -