घरमहाराष्ट्रBJP Manifesto : भाजपाच्या जे पोटात तेच ओठात; संविधान बदलण्याच्या मनोदयावरून मविआने...

BJP Manifesto : भाजपाच्या जे पोटात तेच ओठात; संविधान बदलण्याच्या मनोदयावरून मविआने घेरलं

Subscribe

भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात वन नेशन, वन इलेक्शन अंतर्गत कॉमन इलेक्टोरल रोलची व्यवस्था करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र वन नेशन, वन इलेक्शनवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज सकाळी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाचे संकल्पपत्र असे जाहीरनाम्याचे नाव असून पक्षाने गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच वन नेशन, वन इलेक्शन अंतर्गत कॉमन इलेक्टोरल रोलची व्यवस्था करणार असल्याचेही भाजपाने म्हटले आहे. मात्र वन नेशन, वन इलेक्शनवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (Lok Sabha Election 2024 BJP Manifesto Maviya attacked the BJP for its desire to change the constitution)

सुषमा अंधारे यांनी ट्वीट करताना म्हटले की, भाजपाच्या जे पोटात तेच ओठात आहे. भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्राच्या नावाखाली “वन नेशन वन इलेक्शनची” घोषणा ही सरळसरळ भारतीय संविधान बदलण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात पंकजा मुंडे म्हणताना दिसतात की, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, तर लोकसभेची, संसदेची निवडणूक आहे. या देशाची राज्यघटना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तसं बिल आणून काही नवीन नियम आणायची आहे. यासाठी मोठा माणूस तिथे गेला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

विजय वडेट्टीवारांनीही साधला भाजपावर निशाणा (Vijay Vadettivar targeted BJP)

वन नेशन, वन इलेक्शनवरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आंबेडकर स्वतः आले तरी ते संविधान बदलू शकत नाहीत. मात्र आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आजच्या दिवशीच भाजपाचे अयोध्येतील विद्यमान खासदार लल्लू सिंह उघडपणे सांगत आहेत की, भाजपाला संविधान बदलायचे आहे. म्हणून त्यांना 400 जागा जिंकायच्या आहेत. यावेळी त्यांनी लल्लू सिंह यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात लल्लू सिंह बोलताना दिसतात की, घटना दुरूस्ती करावी लागेल आणि खूप काम करावे लागेल. 272 जागांमध्ये सरकार बनू शकते, पण 272 जागांचे सरकार घटनादुरुस्ती करू शकत नाही. नवीन संविधान बनवायचे असेल तर त्यासाठी दोनपेक्षा जास्त तृतियांश बहुमताच्या जागा आवश्यक आहेत, असे लल्लू सिंह यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -