आरोग्य विभागात होणार २५ हजार कर्मचाऱ्यांची भरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय

आरोग्य विभागात होणार २५ हजार कर्मचाऱ्यांची भरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विरोधाच्या लढाईत सज्ज झाली असून आपले कर्तव्य चोख बजावताना दिसताय. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली की, कोरोनाच्या नावाखाली अवाजवी दर लावत रुग्णांकडून पैसे लुटणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सला सरकारने मोठा दणका दिला आहे. अशा गोष्टींना आळा घालण्यात येणार असून सर्व दर हे ठरवून दिले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. यावेळी २५ हजार कर्मचाऱ्यांची भरती आरोग्य विभागात करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

आरोग्य क्षेत्रातील एकही जागा रिक्त राहणार नाही

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील एकही जागा रिक्त ठेवणार नाही. सर्व कर्मचारी वर्ग भरण्यासाठी तात्काळ संबधित सचिवांना आदेश देण्यात आले असून बढती देखील तात्काळ करण्यात येणार आहेत. यामध्ये येत्या काही महिन्यांमध्ये २५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभाग अशा सर्व विभागाच्या रिक्त जागा भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासगी हॉस्पिटल्सला अवाजवी दर घेता येणार नाही

कोरोना महामारीचा गैरफायदा कोणीच घेऊ नये. अशा गोष्टींना सरकार चाप लावणार असून त्यासाठी नियोजन देखील करण्यात आले आहे. कोणत्या गोष्टींना किती शुल्क आकारण्यात यावे हे देखील निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटल्सला अवाजवी दर रुग्णांकडून घेता येणार नाही तसे झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.


Coronavirus: १५ दिवस सेवा द्या अन्यथा कारवाई; खासगी डॉक्टरांना सरकारची तंबी
First Published on: May 6, 2020 9:16 PM
Exit mobile version