भरवस्तीत कचऱ्याची शेड, लोकांच्या आरोग्याशी खेळ

भरवस्तीत कचऱ्याची शेड, लोकांच्या आरोग्याशी खेळ

माहिम पश्चिमच्या नरसंजीवाडी भागातील कचरा शेड

नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई’ ही संकल्पना मुंबई महापालिकेकडून राबविली जाते. या योजनेंतर्गत मुंबईतील ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी पालिकेने पावलंही उचलायला सुरूवात केली आहे. मात्र, एकीकडे स्वच्छ आणि सुंदर मुंबईचा विचार करताना दुसरीकडे पालिका शहरात राहणाऱ्या रहिवाशांचा विचार करताना दिसत नाहीयेत. मुंबईतील माहिम इथल्या नरसंजीवाडी भागात याबाबतचे ढळढळीत सत्य पहायला मिळत आहे. माहिम पश्चिम परिसरातील कचरा जमा करण्यासाठी पालिकेच्या वतीने नरसंजीवाडी येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत कचऱ्याची गाडी उभी केली जाते. याचा तिथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होत असतानाच, त्यात भर म्हणून आता पालिकेने याच भागात कचऱ्यासाठी आणखी एक शेड देखील उभारली आहे. त्यामुळे पालिका स्वच्छतेच्या नावाखाली स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे का? असा सवाल इथल्या स्थानिकांकडून केला जात आहे.

आदेशानंतरही कार्यवाही नाही

महत्वाची बाब म्हणजे ही कचरा शेड बांधण्याविषयी पालिकेकडून कोणताही बोर्ड लावण्याक आला नव्हता. याबाबत स्थानिक रहिवासी उपासना फर्नांडिस यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता आणि जी नॉर्थ पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खेैरनार यांचाशी पत्रव्यहार केला होता. त्यांनतर खैरनार यांनी सदर जागा बदली करा असे आदेशही पालिका अधिकारी तानाजी घाग यांना दिले होते. मात्र अजूनही येथे कचऱ्यासाठी बांधलेली शेड तशीच आहे.  सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या भागात सफाई कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पालिकेने बॉक्स ठेवले आहेत. मात्र या बॉक्स समोर चक्क दारूची पार्टी रंगल्याचे पहायला मिळत आहे.

दरम्यान याबाबत आम्ही सुनिल घाग यांच्याशी बोललो असता, ते म्हणाले ”लोकांनी तक्रारी केल्यामुळे आम्ही काम थांबवले आहे. आम्हाला आयुक्तांकडून सांगितले होते की लोक ऐकत नसतील तर त्यांच्यावर केस टाका मात्र मी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे”. याशिवाय इथल्या शेडमध्ये फक्त सुका कचरा टाकण्यात येणार आहे, अशी माहिती घाग यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

First Published on: July 18, 2018 5:28 PM
Exit mobile version