‘बनावट नोटा’ छापणाऱ्या तरुणाला अटक

‘बनावट नोटा’ छापणाऱ्या तरुणाला अटक

'बनावट नोटा' छापणाऱ्या तरुणाला अटक

नवी मुंबईमध्ये एका घरावर धडक कारवाई करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबई येथील कामोठे या परिसरातील एका घरावर छापा टाकून बनावट नोटा छापण्याऱ्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भूषण साळुंखे असे या तरुणाचे नाव असून याला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. युटूबवर नोटा बनविण्याच्या प्रात्याक्षिकातून तो प्रिंटरच्या साहययाने दोन हजार रूपयाच्या नकली नोटा छापायचा अशी कबुली त्याने पोलिसांना दिली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रिंटरच्या साहय्याने छापायचा दोन हजाराच्या ‘नोटा’

नवी मुंबईतील कामोठे येथे भूषण साळुंखे हा भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. एका व्यवहारात भूषणने डोंबिवलीत राहणारा मित्र सुकेश याला ५० हजार रूपये दिले होते. सुकेशने हे पैसे एका बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनच्या माध्यमातून पैसे जमा केले होते. मात्र यातील २५ नोटा बनावट असल्याचे बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर बँक प्रशासनाने ही माहिती विष्णुनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी सुकेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता भूषणने हे पैसे दिल्याचे त्यांने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी भूषणला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर बनावट नोटांचा भांडाफोड झाला.

युटूबवर नोटा कशा बनवायच्या याचा व्हिडिओ बघून प्रिंटरच्या साहय्याने दोन हजाराच्या नोटा छापल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यासाठी ३० जानेवारीला प्रिंटर देखील त्यांनी खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भूषणला अटक केली असून त्याच्याकडून प्रिंटर मशीन जप्त केली आहे. तसेच त्याने किती बनावट नोटा छापल्या आणि कुठे कुठे दिल्या त्याचा पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा – अहमदनगरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश; २ जणांना अटक

हेही वाचा – बनावट डिग्रीद्वारे मेडीकल स्टोअर्स चालवणाऱ्या टोळीस अटक


 

First Published on: February 25, 2019 9:59 PM
Exit mobile version