घरमुंबईबनावट डिग्रीद्वारे मेडीकल स्टोअर्स चालवणाऱ्या टोळीस अटक

बनावट डिग्रीद्वारे मेडीकल स्टोअर्स चालवणाऱ्या टोळीस अटक

Subscribe

ठाणे येथे बनावट प्रमाणपत्राद्वारे परराज्यातील डी - फार्मसीची डिग्री मिळवून त्याद्वारे मेडीकल स्टोअर्स चालविणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बनावट प्रमाणपत्राद्वारे परराज्यातील डी – फार्मसीची डिग्री मिळवून त्याद्वारे मेडीकल स्टोअर्स चालविणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हेशाखेने पर्दापाश केला आहे. या टोळीतील मुख्य आरोपीसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आलेल्या तक्रारीवरून अशा बोगस मेडीकल स्टोअर्सवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती दिपक देवराज उपआयुक्त यांनी दिली आहे.

बनावट प्रमाणपत्राद्वारे

असा उघडकीस आला प्रकार

ठाणे शहर आणि आजुबाजुच्या परिसरातील काही मेडिकल स्टोअर्समध्ये पुरेसे शिक्षण आणि ज्ञान नसतानाही फार्मासिस्ट म्हणून काही जण काम करत असल्याची तक्रार पोलिस स्थानकात करण्यात आली होती. या अनुषंगाने तपास करताना दिप पॅरामेडीकल ऑर्गनायझेशन ढोकाळी ठाणे या शिक्षण संस्थेतून दहावी आणि बारावी पासचे बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, नवी दिल्लीच्या माध्यमिक शिक्षा परिषदेच्या नावाने उपलब्ध होत असल्याची बाब समोर आली. ही प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून त्या द्वारे डी-फार्मसीचे सर्टिफिकेट प्राप्त करून त्याची महाराष्ट्र स्टेट फार्मसी काऊन्सीलकडे नोंद करून मेडीकल चालवण्याचा परवाना प्राप्त केला जात होता. औषधे विक्रीचे कोणतेही ज्ञान नसताना त्या परवान्यावर मेडीकल चालवून शासनाची आणि नागरिकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असता त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -
बनावट डिग्रीद्वारे मेडीकल स्टोअर्स चालवणाऱ्या टोळीस अटक

या आरोपींना २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे शहरातील आदर्श मेडिकल खोपट येथील फार्मासिस्ट अरविंद कुमार लंच्छीराम भट, जय मेजीकल दिवा भिवंडीचे राजू दशरथ यादव, सेन्ट्रल मेडीकल काल्हेर भिवंडीचे बुधाराम बभुतराव आजेनिया, महावीर मेडीकल मनोरमा नगरचे बलवंतसिंह खुशालसिंह चौहान यांना चौकशीअंती ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस गुन्हेशाखेकडून करण्यात येत आहे.


वाचा – अहमदनगरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश; २ जणांना अटक

- Advertisement -

वाचा – कॉलेजचे विद्यार्थी मौजेखातर बनले बनावट टीसी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -