घरमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश; २ जणांना अटक

अहमदनगरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश; २ जणांना अटक

Subscribe

अहमदनगरमध्ये बनावट नोटा छापण्यात येणाऱ्या झेरॉक्स मशिनच्या दुकानात धडक कारवाई करत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अहमदनगरमध्ये एका झेरॉक्सच्या दुकानावर धडक कारवाई करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. नगरच्या मध्यवस्तीत असलेल्या वंजार गल्ली परिसरातील एका झेरॉक्सच्या दुकानावर छापा टाकून बनावट नोटा छापण्याचा कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश करत ४१ हजार रूपयांच्या बनावट नोटांसहीत २ जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलीसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

शहरातील वंजार गल्लीतील एका झेरॉक्सच्या दुकानात बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. या मिळाल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मिटके यांच्या सहत तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वंजार गल्लीतील सदरच्या झेरॉक्सच्या दुकानावर छापा मारला. या दुकानाची तपासणी केली असता तेथे २ हजार, ५००, २०० आणि १०० रूपयांच्या बनावट नोटा लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्यासोबत कॉम्प्युट, कलर झेरॉक्स आणि प्रिंटर यांच्या सहाय्याने या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. पोलीसांनी या दुकानातून तब्बल ४१ हजार रूपयांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी कधीपासून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. बनावट नोटांचे वितरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच चौकशी दरम्यान बनावट नोटांच्या या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

वाचा – दोन हजार रुपयांची बनावट नोट विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -