खिशात मोबाईल ठेवत असाल तर सावधान…

खिशात मोबाईल ठेवत असाल तर सावधान…

फोन जळाल्याचे सीसीटीव्ही फुटेज

खिशात ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच भांडुप येथे घडली आहे. भांडुप रेल्वे स्टेशन परिसारातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेत मोबाईल धारकाचा शर्ट जळाला असून त्याच्या छातीला दुखापत झाली. मोबाईल ही काळाची गरज आहे, तरीही त्याचा सांभाळून वापर करणे आवश्यक आहे. अती वापरामुळे मोबाईल गरम होऊन पेट घेण्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. मात्र भांडुपच्या घटनेप्रमाणे इतर घटनांचे चित्रीकरण समोर येत नसल्याने या घटनेचे दाहकता आपल्यासमोर येत नाही..

नेमका कसा घडला प्रकार
भांडुप स्टेशनजवळील ‘बगिचा हॉटेल’मध्ये सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये जेवायला आला होता. हॉटेलमध्ये बसलेला असतानाच अचानक मोबाईलमधून धूर येण्यास सुरुवात झाली. या प्रकारामुळे घाबरुन काय करावे, हे त्याला सुचले नाही. धूर येत असलेला मोबाईल त्याने खिशातून बाहेर काढला. मात्र मोबाईल गरम असल्याने त्याने तो फेकला. काही क्षणांतच मोबाईलचा धूर हॉटेलमध्ये पसरल्याने इतर लोकही घाबरुन सैरा वैरा पळू लागले.

घटनेचा लाईव्ह फुटेज पहा येथे

मोबाईलची काळजी घेण्यासाठी जाणून घ्या या गोष्टी

⦁ मोबाईलची बॅटरी खराब झाली किंवा फुगली तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
⦁ मोबाईलची बॅटरी जर बनावट असेल तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
⦁ बॅटरी वारंवार गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर हे धोक्याचे लक्षण आहे.
⦁ बॅटरी बॅकअप कमी किंवा बॅटरी पूर्णपणे उतरत असल्यास तात्काळ बॅटरी बदलने आवश्यक आहे.
⦁ गरजे पुरतीच बॅटरी चार्ज करावी. पूर्ण रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवू नये
⦁ पॉवर बँक वापरत असाल तर विश्वसनीय कंपनीच्याच वापराव्यात

First Published on: June 6, 2018 2:33 PM
Exit mobile version