मराठीची सक्ती करणाऱ्यांवर रावतेंची टीका

मराठीची सक्ती करणाऱ्यांवर रावतेंची टीका

मराठी भाषेसाठी प्रत्येक मराठी भाषकांमध्ये तळमळ असावी. मात्र मराठीचे सक्तीकरण म्हणजे मातृभाषेचा अपमान करणे आहे. सक्तीकरणाने भाषा टिकणार नाही, तर ती जगविण्यासाठी वास्तवादी प्रयत्न करायला हवे आहेत. मराठी आपली आई आहे. तिच्यासाठी कायदा आणणे अपमानकारक असल्याचे मत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या सांगता सोहळ्यात मांडले असून दिवाकर रावतेंनी मराठीची सक्ती करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

इंग्रजी जागतिक भाषा नाही

गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालय येथे मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यामाने मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते प्राबल्य ही समस्या असण्यामागे, इंग्रजी माध्यमांच्याा शाळांचे वाढते प्राबल्य ही समस्या असण्यामागे, इंग्रजीचा वाढता आग्रह कारणीभूत असल्याचे दिवाकर रावते म्हणाले. तसेच आज इंग्रजीचा आधार घेतल्याशिवाय मराठी रुजवता येत नाही, अशी परिस्थिती आपण निर्माण केली आहे. मुळात इंग्रजी जागतिक भाषा नाही, तर जर्मन ही जागतिक भाषा आहे. जगाच्या पाठीवर इंग्रजीचा आग्रह सर्वत्र होत नाही. कित्येक देशाननी आपापली भाषा प्रमाण मानली आहे, असे सांगत मराठी भाषेला आपणच अडचणीत आणल्याची टीका त्यांनी केली आहे.

शून्य निकाल लागणाऱ्या मराठी शाळांची संख्या मराठवाड्यात

साहित्य संमेलनाची अध्यक्षीय भाषणे चर्चेचा विषय असतात. परंतु एकही संमेलनाचे अध्यक्ष वर्षभर मराठीच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात फिरल्याचे पाहिले नाही. एकीकडे मराठी भाषा आणि शाळा वाचविण्यासाठी पालक संमेलने घ्यावी लागतात आणि दुसरीकडे मात्र परदेशात मराठी साहित्य संमेलन भरविली जातात हे दुर्दैव आहे. १९९७ परयंत दहावीच्या परीक्षेत शून्य निकाल लागणाऱ्या मराठी शाळांची संख्या मराठवाड्यात अधिक होती. आता तिथे एकही शून्य निकालाची शाळा नाही, मात्र मुंबईत अशा शाळा आहेत, असेही ते पुढे म्हाणाले. सामाजिक स्तर गाठण्याच्या स्पर्धेत मुलांना इंग्रजी शाळेत घातले जाते, अशी खंत अंनिसच्या कार्यकर्त्यां मुक्ता दाभोलकर यांनी ‘मातृभाषेतील’ शिक्षण आणि आई या चर्चासत्रात व्यक्त केली आहे.

लोकसहभाग मिळविणाऱ्या शिक्षकांची राज्य पुरस्काराय़ी वर्णी लागते. मग शिक्षकांनी शिकविण्याच्या पद्धतीने कुशलता आणण्यावर भर द्यावा की लोकसहभागासाठी भटकत फिरावे. नेमका शिक्षणाचा उद्देशच यात हरवत चालला आहे. संस्थाचलित शाळांमधये लोकसहभाग घेण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे हे शिक्षक शिक्षणासाठी झटत असेल तरी पुरस्काराठी पात्र ठरत नाहीत.  – शिवाजी अंबुलगेकर, नांदेडचे शिक्षक


वाचा – महाराष्ट्र महामंडळ कशाला? दिवाकर रावतेंनी व्यक्त केली नाराजी!

वाचा – रिक्षाचालकांनो उद्धट वर्तन कराला तर खबरदार – दिवाकर रावते


 

First Published on: December 10, 2018 1:24 PM
Exit mobile version