कोविड सेल्फ टेस्ट किटवर मुंबईत बंदी आणणार, महापौरांचे संकेत

कोविड सेल्फ टेस्ट किटवर मुंबईत बंदी आणणार, महापौरांचे संकेत

कोविड सेल्फ टेस्ट किटवर मुंबईत बंदी आणणार, महापौरांचे संकेत

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा आता ५० हजारांच्या पार गेला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुंबईतील दररोजच्या कोरोना चाचण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोना सेल्फ टेस्ट किटचा देखील पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोना सेल्फ टेस्ट किटचा वापर करत आहे. बाजारात या किटची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. मात्र या कोरोना सेल्फ टेस्ट किट्स मुंबईकरांना वापरता येणार नसल्याचे म्हटले जात आहे. कोरोना सेल्फ टेस्ट किटवर बंदी घालण्यात येणार असल्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.

याबाबत महापौर म्हणाल्या, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. अनेक जणांना लक्षणे आढळली तर ते त्वरित कोरोना सेल्फ टेस्ट किट आणून चाचणी करतात आणि पॉझिटीव्ह आल्यावर घरीच उपचार करतात. मात्र अशा चाचण्यांमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला असून या किटवर पूर्णपणे बंदी आणणार आहोत असे महापौर म्हणाल्या. यासंबंधीचे आदेश पालिकेकडून आरोग्य विभागाला देण्यात आले असून मेडिकलमध्ये असे किट आढळल्यास जे जप्त करण्यात येतील असेही महापौरांनी म्हटले आहे.

राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत दररोज २० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईत या किटचा वापर सर्वाधिक वाढला आहे. मात्र अशा टेस्टचा अहवाल अचूक असेल असे नाही. यातून काही रुग्णांचे खरे अहवाल लपून देखील राहू शकतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या किटवर बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे.

 

First Published on: January 9, 2022 11:09 PM
Exit mobile version