मुंबईला गोवरचा विळखा; 412 बालकांना लागण, 21 मुलं ऑक्सिजनवर

मुंबईला गोवरचा विळखा; 412 बालकांना लागण, 21 मुलं ऑक्सिजनवर

मुंबईत गोवर संसर्गाची तीव्रता दिवसेंदिवस वेगाने वाढतेय. सर्वाधिक लहान मुलं या आजाराच्या विळख्यात अडकत आहेत. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील गोवरग्रस्त बालकांची संख्या ही 412 वर पोहचली आहे. यातील 21 बालक ही ऑक्सिजनवर आहेत. सोमवारी मुंबईत 4587 गोवरग्रस्त संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णालयात दाखल झालेल्या गोवरग्रस्त मुलांची संक्या 89 झाली आहे.

दरम्यान मुंबईत गोवरग्रस्त 4 मुलं आयसीयूमध्ये तर 2 बालकांवर व्हेंटिलेटवर उपचार सुरु आहेत. यात आज 19 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आज 40 रुग्णांना डिचार्ज देण्यात आला आहे. मात्र सुदैवाने गोवरमुळे मुंबईत आज एकही मृत्यू झालेला नाही. मात्र मुंबईतील लहान मुलांना गोवर आजारापासून वाचवण्यासाठी पालिकेने रुबेला लसीकरण मोहिम वेगाने सुरु केली आहे.

दरम्यान मुंबईत 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील 51 आरोग्य केंद्रातील 1,88,013 मुलांपैकी 11,261 बालकांना एमआर लसीकरणाचा अतिरिक्त डोस देण्यात आला आहे. तर 6 ते 9 महिने वयोगटातील आरोग्य केंद्रातील ज्या ठिकाणी 9 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त आहे. अशा आरोग्य केंद्रातील एकून 3569 बालकांपैकी 686 बालकांना आजपर्यंत गोवर रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे.


संजय गांधी नॅशनल पार्कात आता सिंहाची जोडी; उद्यानातील अधिवासात मुनगंटीवार सोडणार

First Published on: December 5, 2022 10:05 PM
Exit mobile version