रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील रेल्वे प्रवाशांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचे वेळापत्रक वाचूनचं बाहेर पडा. कारण रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने नियमित देखभालीच्या कामसाठी रविवार १५ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आणि हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. (Mega block on central railway and harbor railway line on Sunday)

मध्य रेल्वे

मध्ये रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तसेच, रविवारी सकाळी 11.05 पासून ते दुपारी 3.55 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्यात येणार आहेत. तसेच, संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 11.05 पासून ते संध्याकाळी 4.05 पर्यंत असणार आहे. पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.

शिवाय, ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. तसेच, ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ – खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावणार आहेत.


हेही वाचा – मी तुम्हाला तिळगूळ देते, गोड बोलायला सुरुवात करा; राणांचा ठाकरेंना टोला

First Published on: January 14, 2023 3:54 PM
Exit mobile version