मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी २७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० वाजता ते दुपारी ३ वाजेर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान धिम्या मार्गावरील सर्व डाउन विशेष उपनगरी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर धिम्या मार्गावरील सर्व अप उपनगरी विशेष सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी डाउन हार्बर मार्गावर सकाळी १० वाजून ४० ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर अप हार्बर मार्गावर सकाळी १० वाजतापासून ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत बंद राहील. तर पनवेल/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी ९.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

First Published on: September 25, 2020 8:51 PM
Exit mobile version