Mega block update : हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

रविवारी ७ नोव्हेंबर रोजी हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक कार्यान्वित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाकडून हा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हार्बर मार्गावर ‘या’ वेळेत असेल मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११ : ४० ते सायंकाळी ४:४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११ :१० ते सायंकाळी ०४ : १० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावर ‘या’ वेळेत असेल मेगाब्लॉक

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० पर्यंत आणि ठाणे येथून सकाळी १० : ३५ ते सायंकाळी ४:१९ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करीता सुटणा-या आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून सकाळी १० :१५ ते सायंकाळी ०४ : ०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील.

मेन लाईनवर मेगाब्लॉक नाही

या मेगा  ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११:३४  ते सायंकाळी ४:४७  वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या ट्रेन बंद असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९ : ५६ ते सायंकाळी ४ : ४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९ : ५३ ते दुपारी ३ : २० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०:४५ ते सायंकाळी ४:५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

 


हे ही वाचा – Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव, १० जणांचा होरपळून मृत्यू


 

 

First Published on: November 6, 2021 2:13 PM
Exit mobile version