मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर अवतरणार ‘मेघदूत’, करणार हवेतून पाण्याची निर्मिती

मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर अवतरणार ‘मेघदूत’, करणार हवेतून पाण्याची निर्मिती

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सहा रेल्वे स्थानकांवर आता नवीन तंत्रज्ञाचा वापर करून प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी हवेतून तयार करणाऱ्या यूएन-मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात येणार आहे. अॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन (AWG) ‘मेघदूत’ असं या यंत्रच नाव आहे. हे एक यंत्र आहे जे कंडेन्सेशन विज्ञान वापरून सभोवतालच्या हवेतून पाणी तयार करते. हे पाणी आता रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्षी जूनमध्ये, युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्टने भारताकडून जल व्यवस्थापनासाठी जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) या उपक्रमाला मान्यता दिली आहे.

हे ही वाचा – Mumbai Local News : मुंबई / साईनगर शिर्डी – काकीनाडा बंदर दरम्यानच्या गाड्यांच्या संरचनेत बदल

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 17 ‘मेघदूत’ AWG किऑस्क बसवण्यासाठी मैत्री एक्वाटेक प्रायव्हेट लिमिटेडला ‘न्यू, इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू अर्निंग स्कीम’ (NINFRIS) अंतर्गत पाच वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. त्यासाठी रेल्वेला सहा स्थानक परिसरात किऑस्कसाठी प्रति वर्ष 25.5 लाख रुपये परवाना शुल्क दिले देण्यात येईल असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा – लालबागच्या राजाचा प्रसादही मिळणार ऑनलाइन, ‘अशी’ नोंदवा ऑर्डर

कोणत्या 6 रेल्वे स्थानकांवर उपकरण लावण्यात येणार आहे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकांवर प्रत्येकी पाच उपकरणे लावण्यात येणार आहेत. त्याचसोबत ठाणे रेल्वे स्थनाकावर चार उपकरणे लावण्यात येणार आहेत. तर कुर्ला, घाटकोपर आणि विक्रोळी या रेल्वे स्थानकावर प्रत्येकी एक उपकरण लावण्यात येणार आहे.

मेघदूत-AWG नवीन तंत्रज्ञान हवेतील पाण्याची वाफ ताज्या आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यात रूपांतरित करते. त्याचबरोवर हे उपकरण सुरु केल्या नंतर काही तासांमध्येच यातून पाणी मिळते. हे उपकरण दिवसाला १००० लिटर पाणी तयार करते.

हे ही वाचा –  मेट्रो ३ मुळे राजकीय प्रदूषणही बंद

प्रवाशांना फायदा

लोकल मधून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा इतरही प्रवाशांसाठी याचा उपयोग होणार आहे. यामध्ये 300 मिली लिटर पाणी प्रवाशांना फक्त 5 रुपयांना मिळणार आहे. अर्धा लिटर पाण्यासाठी 8 रुपये तर एक लिटर पाण्यासाठी 12 रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर या तंत्रज्ञानाचा वापर करताना पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि हे उपकरण टिकाऊ आहे. असं मैत्री एक्वाटेक प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ नवीन माथूर यांनी सांगितले.

 

First Published on: August 31, 2022 12:44 PM
Exit mobile version