श्वेता महालेंची साडी; अन महिला आमदारांमध्ये चर्चा

श्वेता महालेंची साडी; अन महिला आमदारांमध्ये चर्चा

श्वेता महाले; भाजप आमदार

मराठी भाषा दिन आज राज्यभर साजरा करण्यात आला. विधान भवनात देखील आज मोठ्या उत्साहात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. मात्र, या सगळ्यामध्ये एक साडी फारच भाव खाऊन गेली. चक्क या साडीचे कौतुक करताना महिला आमदार दिसल्या. भाजपच्या आमदार श्वेता महाले नेहमीप्रमाणे आज सभागृहाच्या कामकाजासाठी विधान भवनात पोहोचल्या मात्र, त्यांनी नेसलेल्या साडीने अनेक महिला आमदारांमध्ये चर्चेचा विषय झाला.

म्हणून महालेंच्या साडीने भाव खाल्ला

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने`मातृभाषा’ असा मजकूर लिहिलेली साडी महाले नेसून विधान भवनात पोहोचल्या. संस्कृत श्लोक असलेल्या या साडीवर “मातृभुमे! नमो मातृभुमे! नम:, तव गरिभ्यो नमस्ते नदीभ्यो नम:, तव वनेभ्यो नमो जनपदेभ्यो नम:”  अशी संस्कृत वचने लिहिली होती. दरम्यान, याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी ‘भारतातील प्रसिध्द कारागिरांच्या प्रदर्शनातील ही साडी मला पहिल्याच नजरेत आवडली. तिच्यावरचे रंगसंगती खूप छान आहे. तसेच ही साडी आता सगळ्यांनाच आवडली असल्याचे अनेकांनी मला सांगितले’.


हेही वाचा – धक्कादायक! रेल्वेत चोरी करणारे ८५ टक्के चोर मोकाट


 

First Published on: February 27, 2020 7:01 PM
Exit mobile version