अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती

अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती

अश्विनी भिडे

मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती करण्यात आली आहे. दरम्यान मेट्रो-३ च्या आरेमधील कारशेडच्या बांधकामावरून अश्विनी भिडे यांना वादाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा राज्यातील सत्तांतरानंतर अश्विनी भिडे यांची बदली होईल अशी शक्यता होती. पण राज्य सरकारने त्यांना बदली ऐवजी बढती दिली आहे.

मेट्रोवरुन आदित्य ठाकरे, अश्विनी भिडेंमध्ये वाद

कुलाबा ते सीप्झ या दरम्यान मेट्रो-३ चा प्रकल्प सुरु आहे. या मेट्रोसाठी आरे येथील कारशेडच्या बांधकामावरून अश्विनी भिडे आणि पर्यावरणवादी संघटनांमध्ये वादाची ठिणगी पेटली होती. रात्रीच्या वेळेस आरेमधील झाडे कोपण्यात आली. त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला होता. त्यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीसुद्धा पर्यावरण प्रेमींना पाठींबा दर्शवत अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती. अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉरही सुरू झाले होते.

First Published on: December 31, 2019 2:39 PM
Exit mobile version