metro 7 : किचकट जागेतही एमएमआरडीएचा ‘टॉप जॉब’

metro 7 : किचकट जागेतही एमएमआरडीएचा ‘टॉप जॉब’

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २३ जून रोजी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) जंक्शन स्टेशन येथे अखेरच्या पाईल कॅपचे काम पूर्ण केले. हे काम पूर्ण करताना एमएमआरडीए समोर अनेक मोठी आव्हाने होती. त्या सर्वांचा सामना करून एमएमआरडीएने हे महत्वपूर्ण ध्येय साध्य केले आहे. मेट्रो 7 प्रकल्पाअंतर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान प्रामुख्याने विविध सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांच्या जाळ्याला धक्का न देता हे काम अतिशय हुशारीने पुर्ण करण्यात आले आहे. मेट्रो ७ चे काम डेडलाईनमध्ये पुर्ण करण्यासाठी एमएमआरडीेएमार्फत अतिशय वेगाने काम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून हे महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पुर्ण करण्यात आला आहे.

पाईल कॅपच्या या महत्वपूर्ण बांधकामादरम्यान एमएमआरडीएला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पाईल कॅपच्या कामाच्या बांधकामादरम्यान जमिनीखाली असलेल्या असंख्य वाहिन्यांचे जाळे या जंक्शनच्या ठिकाणी होते. तब्बल ६०० मिमी च्या २ ऑपरेशन व्हॉल्व कीज, ३०० मिमी ची महानगर गॅस लाईन, ४५० मिमी ची मलवाहिनी आणि अशा अनेक विद्युत, फायबर आणि एमटीएनएल वाहिन्यांबद्दल माहिती मिळाली. जमिनीखाली असलेल्या अनेक वाहिन्यांची माहिती मिळाल्यानंतर पाईल कॅप कशा प्रकारे बसवता येईल याचा अभ्यास करणे एमएमआरडीएला सोपे गेले. त्यानंतरचं योग्य त्या खोलीसह पाईल कॅप बसवण्यात आली. पाईल कॅप बसवण्याचे काम जमिनीच्या खोलवर जाऊन करण्याचे काम असल्यामुळे सर्वात मोठे आव्हान होते. तसेच जमिनीखालील अनेक वाहिन्या, कठीण खडके,आणि मुंबईत जागेची कमतरता यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून खोदकाम करून मोठमोठया यंत्रासह काम करणे खूप कठीण झाले होते. परंतु या सर्वांवर मात करत जेव्हीएलआर येथील पाईल कॅपचे काम आता पूर्ण झाले आहे. विशेषतः इतर स्थानकांच्या पाईल कॅपच्या कामाच्या तुलनेत जेव्हीएलआर जंक्शन पाईल कॅप तांत्रिक बाबींच्या बाबतीत अद्वितीय आहे.

First Published on: June 24, 2020 6:38 PM
Exit mobile version