‘ईडी’च्या नोटीसीनंतर आता मनसेची मुंबईत बॅनरबाजी

‘ईडी’च्या नोटीसीनंतर आता मनसेची मुंबईत बॅनरबाजी

'ईडी' च्या नोटीसीनंतर आता मनसेची मुंबईत बॅनरबाजी

कोहीनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. आता तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनर लावले असून, सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय आहे या बॅनरवर 

मुंबईच्या रस्त्यावर मनसेच्या अखिल चित्रे यांनी बॅनर लावले असून, या बॅनरवर ‘एका गोष्टीचे लक्ष असू द्या, चौकशी कोहीनूर मिलची नव्हे… तर मराठी माणसाच्या हृदयातील कोहिनूर हिऱ्याची करताय!’ असे लिहिण्यात आले आहे. दरम्यान राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावल्याचे वृत्त कळताच मनसे सैनिक आक्रमक झाले होते. मनसे नेत्यांनी सोमवारी सकाळी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

त्यानंतर मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी २२ ऑगस्ट रोजी ठाणे बंदची घोषणा केली होती. तर मनसे नेते अभिजित पानसे यांनी राज्यातील नागरिकांना २२ तारखेला अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा देऊन टाकत अशा चौकशींना मनसे घाबरणार नाही. हिटलरशाहीविरोधात आमचा लढा सुरूच राहिल, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. यासर्व पार्श्वभूमिवर आज सकाळी ११ वाजता राजगड येथे मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

First Published on: August 20, 2019 9:12 AM
Exit mobile version