मनसेला जोर का झटका; मंदार हळबेंचा भाजपात प्रवेश

मनसेला जोर का झटका; मंदार हळबेंचा भाजपात प्रवेश

मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला भाजपमध्ये पक्षप्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण-डोंबिवलीमध्ये एका मागून एक मोठे झटके बसत आहेत. गेल्या २४ तासात मनसेला दुसरा मोठा झटका बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ अजून एका नेत्याने मनसेला रामराम ठोकला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे आता राजकारणात एकच चर्चा रंगली असून येत्या आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंदार हळबे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते असून ते गेल्या १० वर्षांपासून कल्याणचे नगरसेवक आहेत. त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवले आहे.

कृष्णकुंजावर न येता भाजपात गेले

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते मंदार हळबे शिवसेना आणि भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्याचपार्श्वभूमीवर त्यांच्याशी बोलण्याकरता त्यांना कृष्णकुंजावर बोलवण्यात आले होते. मात्र, त्यांनी कृष्णकुंजावर न जाता, भाजपामध्ये प्रवेश केला.

कार्यकर्त्यांनी फसवणूक केली

मनसेचे नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे मनसेत मोठी खळबळ उडाली आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेत्यांच्या पक्षांतरावर राजू पाटील यांनी म्हटले आहे की राजेश कदम आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी फसवणूक केली आहे. राजकीय अमिषाला बळी पडून त्यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे सांगितले आहे.

नवे कार्यकर्ते उभारी घेतील

पक्ष सोडून या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे पक्षाला काही मोठा फरक पडत नाही. असे पाहिला गेले तर हे आज नाही होत आहे, तर असे कितीतरी कार्यकर्ते आहेत. जे या पक्षातून दुसऱ्या जातात. जुने कार्यकर्ते गेले तर काही फरक पडत नाही. कारण नवे कार्यकर्ते उभारी घेतील, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.


हेही वाचा – MCGM Budget : लवकरच मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोजा?


 

First Published on: February 2, 2021 3:18 PM
Exit mobile version