राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, मिळाला डिस्चार्ज

राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, मिळाला डिस्चार्ज

राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, मिळाला डिस्चार्ज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना काल (शनिवार) मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान राज ठाकरे यांच्या कमरेजवळच्या स्नायूवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना आज (रविवार) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे यांचे कुटुंबिय रुग्णालयात उपस्थितीत होते.

माहितीनुसार, काल दुपारी ३च्या सुमारास राज ठाकरे यांच्या कमरेजवळील स्नायूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. विनोद अग्रवाल आणि डॉ. आनंद उत्तुरे यांनी ही शस्त्रक्रिया केली. ही छोटी शस्त्रक्रिया असल्यामुळे ते काल रात्री लिलावती रुग्णालयात मुकामाला होते. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळेस राज ठाकरे यांना घेण्यासाठी कुटुंबिय रुग्णालयात उपस्थितीत होते.

काही महिन्यापूर्वीची राज ठाकरे डेनिस खेळताना घसरून पडले. यावेळेस त्यांच्या हाताला दुखापत झाली आणि त्यांच्या पाठिचा स्नायू देखील दुखावला होता. त्याचाही त्रास त्यांना जाणवत होता. दरम्यान तीन दिवसांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हीसीद्वारे राज ठाकरे यांनी चर्चा झाली. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच लिलावतीमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिला होता. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे उपस्थितीत राहणार होते. पण शस्त्रक्रिया असल्यामुळे ते उपस्थितीत राहू शकले नाही.


हेही वाचा – निवडणूक असणाऱ्या राज्यातील नागरिक कोरोनाचे सुपर स्प्रेडर, निर्बंध घालण्याची मनसेची मागणी


 

First Published on: April 11, 2021 1:04 PM
Exit mobile version