‘शिवमुद्रा’ असलेल्या मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण

‘शिवमुद्रा’ असलेल्या मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण

मनसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. मनसेचे पहिले महाअधिवेशन असून या अधिवेशनात या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. मनसेच्या या नव्या झेंड्यात भगवा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. दोन दिवसांपूर्वीच हा झेंडा समोर आला होता. मात्र, यावर अधिकृत रित्या शिक्कामोर्तब झाला नव्हता. अखेर आज राज ठाकरेंच्या नव्या झेंड्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

झेंड्याचे अनवारण करण्याआधी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. तसेच आपण आज संध्याकाळी भाषण करणार असून त्यात सविस्तर बोलणार असल्याची माहिती देखील दिली आहे.

असा आहे हा झेंडा

मनसेचा नवीन झेंडा समोर आला असून या झेंड्यामध्ये संपूर्ण भगवा रंग वापरण्यात आला आहे. तसेच या झेंड्याच्या मध्यभागी शिवमुद्रा आहे. तसेच या चिन्हाच्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. तसेच निवडणुकीसाठी मनसेकडून पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या तयारी दरम्यान, अनेक नव्या गोष्टी पहायला मिळाल्या आहेत. यातील एक विशेष बाब म्हणजे या अधिवेशनात स्टेजवर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेला ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद; ‘या’ कॉल रेकॉर्डची चर्चा


 

First Published on: January 23, 2020 10:46 AM
Exit mobile version