राज ठाकरे टॅटू पाहून म्हणाले, अरे तुला दुसऱ्या पक्षात घेणार नाहीत; त्यावर मनसैनिकाचे मन जिंकणारे उत्तर

राज ठाकरे टॅटू पाहून म्हणाले, अरे तुला दुसऱ्या पक्षात घेणार नाहीत; त्यावर मनसैनिकाचे मन जिंकणारे उत्तर

राज ठाकरे टॅटू पाहून म्हणाले, अरे तुला दुसऱ्या पक्षात घेणार नाहीत; त्यावर मनसैनिकाचे मन जिंकणारे उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्याच्या तरुण मंडळींना खूप आवडतात. त्यांची भाषण शैली ही प्रत्येकालाच भुरळ पाडणारी आहे. आपण राज ठाकरे यांचे बरेच जबरा फॅन पाहिले आहेत, ज्यांनी आपल्या शरीरावर राज ठाकरे यांचा टॅटू काढला आहे. सध्या असाच एक राज ठाकरेंच्या जबरा फॅनची चर्चा सुरू आहे. या जबरा फॅनने चक्क हातावर राज ठाकरे यांच्या नावाचा ‘राजसाहेब ठाकरे’ असा जबरदस्त टॅटू काढला आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एवढेच नव्हे तर जेव्हा राज ठाकरेंना हा टॅटू दाखवण्यात आला तेव्हाचा त्या दोघांमधील झालेला संवाद चर्चेत आला आहे.

राज ठाकरेंचा हा जबरा फॅन मनसेचा कार्यकर्ता असून त्याचे नाव आकाश तुपे असे आहे. आकाश तुपेने जेव्हा हा टॅटू राज ठाकरेंना दाखवला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, ‘अरे हा टॅटू काढला आहे तर तुला दुसऱ्या पक्षात घेणार नाही. मग पुढे काय करणार?’ यावर कार्यकर्ता आकाश तुपेने उत्तर दिले की, ‘साहेब, मरेपर्यंत मनसे आणि तुम्ही आमचे दैवत आहात. सोडून कसे जाणार?’ सध्या आकाशच्या या टॅटू फोटो तुफान व्हायरल होत आहे.

 

#PromiseDay…💖

महाराष्ट्र सैनिक #श्री.#आकाश_तुपे या कार्यकर्त्याने आज 🚩#मा.#श्री.#राजसाहेबांची🚩 भेट घेतली,हा टॅटू साहेबांना दाखवला,त्यानंतर झालेला संवाद…👇

साहेब(#विनोदाने)😉:- अरे हा टॅटू काढला आहेस तर “#तुला_दुसऱ्या_पक्षात_घेणार_नाहीत” ❌मग पुढे काय करणार?🤷‍♂️

कार्यकर्ता:- साहेब,मरेपर्यंत मनसे आणि तुम्हीच 🙌”#आमचे_दैवत”🙌 सोडून कसे जाणार?

उगाच 🤗”#जिव_ओवाळून”🤗 टाकत नाही राजसाहेबांवर…

#MNS #मनसे Aakash Tupe

Posted by राजेश मोटे on Thursday, February 11, 2021

 

यापूर्वी नवी मुंबई येथील कट्टर राज ठाकरे समर्थक वैभव कंक याने आपल्या पाठीवर राज ठाकरे यांचा टॅटू काढला होता. ही बाब जेव्हा राज ठाकरे पुत्र मुलगा अमित ठाकरे यांचा समजताच त्यांनी या महाराष्ट्र सैनिकाला बोलावून त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर त्याची भेट राज ठाकरेंसोबत करून दिली होती.


हेही वाचा – डोंबिवलीच्या ९० फूट रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा करू खळखट्याक; मनसेचा इशारा


 

First Published on: February 12, 2021 12:07 PM
Exit mobile version