दुर्दैवी! रुग्णालयाच्या शोधात गर्भवती महिलेचा रिक्षातच झाला मृत्यू

दुर्दैवी! रुग्णालयाच्या शोधात गर्भवती महिलेचा रिक्षातच झाला मृत्यू

रुग्णालयाच्या शोधात गर्भवती महिलेचा रिक्षातच झाला मृत्यू

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील अधिकाअधिक रुग्णालये फूल झाली आहेत. त्यामुळे आता रुग्णालयात एकही खाट रिकामी नसल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अनेकांचे मृत्यू देखील होत आहेत. तर ज्या व्यक्ती कोरोनाबाधित नाहीत अशांचे देखील इतर आजारांनी मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत. दरम्यान, अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेला प्रसूतीकरता एकाही रुग्णालयाने प्रवेश न दिल्याने या महिलेचा रिक्षामध्येच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

मुंब्रा येथे २२ वर्षीय महक खान या महिलेला २५ मे रोजी मध्यरात्री अचानक प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या गर्भवती महिलेला घेऊन तिच्या कुटुंबाने पहिली बिलाल रुग्णालये गाठले. मात्र, त्या रुग्णालयाने तिला प्रवेश देण्यास नकार दिला. नंतर तिच्या कुटुंबाने तिच रिक्षा फिरवून प्राइम क्रिटिकेयर रुग्णालय गाठले. मात्र, त्याठिकाणी देखील नकार दिला गेला. मग त्यांनी युनिवर्सल रुग्णलय गाठले. परंतु, त्याही ठिकाणी नकार दिला गेला आणि रुग्णालय शोधत राहण्याच्या नादात एका २२ वर्षीय गर्भवती महिलेचा रिक्षातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अपयशी सरकार

भाजप नेता राम कदम यांनी याबाबत सरकारला दोषी धरले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राम कदम म्हणतात की, ‘अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. हे सरकार अपयशी सरकार असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे.

रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी रुग्णाला प्रवेश नाकारण्यात आलेल्या रुग्णालया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.


हेही वाचा – सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम: तीन फुटांचं अंतर, मास्क अनिवार्य


 

First Published on: May 31, 2020 3:14 PM
Exit mobile version