मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील कुर्ला येथे असणाऱ्या फिनिक्स मॉल परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. आग मोठी असल्याने आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्या असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला पहाटेच्या सुमारास आग लागली आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील फिनिक्स हा मोठा मॉल असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भिवंडीत भांड्याच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी शहरातील झेंडानाका येथे असणाऱ्या एका भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये गोडाऊनमधील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, दोन मजली इमारती मध्ये असलेल्या भांड्याच्या गोदामाला आग लागताच पहिल्या मजल्यावरील आणि शेजारील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. या आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही


Corona Update : राज्यात २८५४ नव्या रूग्णांची भर, ६० जणांचा मृत्यू
First Published on: December 27, 2020 9:09 AM
Exit mobile version