Mumbai Fire Brigade, ६०४ अग्निशमकांची पदे रिक्त

Mumbai Fire Brigade, ६०४ अग्निशमकांची पदे रिक्त
मुंबईतील आपत्कालीन परिस्थितीत दिवस रात्र बचाव कार्यात झोकून देणार्‍या मुंबई अग्निशमन दलातच २५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या अनेक घटनांमध्ये मदतीचा हात देणारे अग्निशमन दल तोकड्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येत सध्या काम करत आहेत. एकुण ९३४ अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त जागा आहेत.
दरवर्षी मुंबईत वाढत्या आगीच्या घटनांचा विचार करता मुंबई अग्निशमन दलास हायटेक बनवल्याची चर्चा आहे, तर सत्यता अशी आहे की मुंबईकरांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणारी मुंबई अग्निशमन दल रिक्त पदांमुळे असहाय होत चालला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाने मुंबईतील अग्निशमन दलातील 25 टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त जागांची माहिती दिली आहे.
 मुंबई अग्निशमन दलाने अनिल गलगली यांना सांगितले की, थेट कारवाईसाठी 14 प्रकारचे 3694 पदे  आहेत. त्यापैकी 2760 पदे सध्या कार्यरत आहेत, तर 934 पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे ही अग्निशामकाची आहे. यात 2340 पैकी 604 पदे रिक्त आहेत. यानंतर 159 चालक यंत्रचालकाचे पद रिक्त आहे. 69 प्रमुख अग्निशामक, 66 दुय्यम अधिकारी, 17 वरिष्ठ केंद्र अधिकारी, 10 केंद्र अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. उपमुख्य तांत्रिक अधिकारी हे पद सुद्धा रिक्त आहे.
या व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यशाळेमध्ये 29 प्रकारची 125 पदे आहेत, त्यापैकी 62 पदे रिक्त आहेत आणि 66 पदावर कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबई अग्निशमन दलात कार्यशाळा ही महत्वाची असते व त्याचा अप्रत्यक्ष संबंध असतो.
मुंबई अग्निशमन दलातील 25 टक्के रिक्त असणाऱ्या पदांबाबत गलगली यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण मुंबई अग्निशमन दल हा महत्त्वाचा विभाग तसेच मुंबईकरांच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहून सरकार तसेच पालिकेने  यास प्राधान्य द्यावे आणि लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.

प्रत्यक्ष कार्यवाहीच्या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे 

उपप्रमुख अग्निशमन अधिकारी १
विभागीय अग्निशमन अधिकारी ३
सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी ३
वरिष्ठ केंद्र अधिकारी १७
केंद्र अधिकारी १०
सहाय्यक केंद्र अधिकारी संदेश २
दुय्यम अधिकारी ६६
प्रमुख अग्निशमक ६९
चालक यंत्रचालक १५९
अग्निशामनक ६०४
एकुण रिक्त पदे ९३४

First Published on: September 7, 2020 4:37 PM
Exit mobile version