Live Mumbai Rain: सांताक्रूझ पूर्व येथील चाळीच्या ३ खोल्यांचा भाग कोसळला

Live Mumbai Rain: सांताक्रूझ पूर्व येथील चाळीच्या ३ खोल्यांचा भाग कोसळला

पावसाचे साचलेले पाणी कमी होताच पुन्हा मध्य रेल्वेची ठराविक उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात येणार…


सांताक्रूझ पूर्व येथील त्रिमूर्ती चाळीच्या ३ खोल्यांचा भाग कोसळला

मुंबईतील सांताक्रूझ पूर्व येथील त्रिमूर्ती चाळीच्या ३ खोल्यांचा भाग आज सकाळी मुसळधार पावसाने कोसळला आहे. या चाळीच्या मागील बाजूस मागील बाजूस असलेल्या ओपन ड्रेन होते. यामध्ये खोलीत असणारे माणसं वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये १ महिला २ मुली बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. या परिसरात शोध मोहीम सुरू असून आणखी एका मुलीला वाचवण्यात यश आले असून पोलिसांनी तिला व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल केले आहे.


महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मिठी नदी लगत असणाऱ्या कुर्ला परिसरातील क्रांतीनगर भागाची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मुंबई शहरात कालपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या या दोन दिवसासाठी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी केला आहे.


महापालिका क्षेत्रातील ठिकाणांना आयुक्तांनी दिली भेट

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करत आहेत. या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू, महापालिका आयुक्तांचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली पाहणी

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांसह महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी हिंदमाता ठिकाणी पाहणी केली आहे.


अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा सुरू राहणार

सोमवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरूच राहणार आहेत.


मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील मराठा कॉलनीजवळ सांताक्रूझ पूर्व येथे संततधार पावसामुळे पाणी साचले आहे.


कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली आहे. टाईम्स ऑफिसच्या जवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.


मुंबई उपनगरातील rain updates

४ ऑगस्ट रोजी मुंबईसह इतर उपनगरातील भागात सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांपर्यंत कुलाबा २२०, सांताक्रूझ २५४, राम मंदिर १५२, मीरा रोड १५२, महालक्ष्मी १७२, विद्याविहार १५९ मिमी आणि ठाण्यासह नवीमुंबईतील अनेक ठिकाणी १५० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता असून ठाणे आणि मुंबईत RED ALERT देण्यात आला आहे.


मुसळधार पावसाने ठाण्यात एकाचा मृत्यू

मुंबईतील जोरदार पावसादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकणी पाणी साचल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा विजेच्या पोलचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता. खांबाला स्पर्श झाल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कालपासून सलग पाऊस पडल्यानंतर मुंबई व ठाण्यात जोरदार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.


मुंबईत High tide ची शक्यता


समुद्राच्या भरतीमुळे वडाळा आणि परळ येथे पाणी साचल्याने मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर उपनगरी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वाशी आणि पनवेल आणि ठाण्यापासून पुढे कल्याण दरम्यान लोकल सेवा चालू आहेत. तर या स्थानकांदरम्यान कोणतीही उपनगरीय गाड्या थांबणार नाहीत. मेल एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक rescheduled केले जात आहे, असे मध्यरेल्वेकडून सांगितले जात आहे.


रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मकर येथे ब्लॉक झाला आहे. तर या पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील रस्त्यात दरड कोसळल्याने वाहतूकीस अडचणी निर्माण होत आहे.


सोमवरी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून आज देखील दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व आपत्कालीन सेवा वगळता मुंबईतील सर्व कार्यालये आणि आस्थापने बंद राहतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेनेकडून सांगण्यात आले आहे.


आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये बंद!

सोमवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक सखल भागात पाणी देखील साचण्यास सुरूवात झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पावसाच्या अतिवृष्टीचा अंदाज पाहता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये व इतर आस्थापने आज बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणीही घराबाहेर पडू नये, असेही सांगण्यात आले आहे.


मुंबईतील कुर्ला, दादर, सायन, किंग्ज सर्कल याठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुढील २४ तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतकर्ता बाळगावी, अशा इशारा पालिकेतर्फे नागरिकांना दिला आहे. गेल्या आठवड्यात काही दिवसांची दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे.

पश्चिम रेल्वे ठप्प

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अत्यावश्यक सेवेकरता सुरु करण्यात आलेली लोकलसेवा ठप्प झाली आहे. तर याचा फटका हार्बर सेवेला देखील बसला आहे. कारण कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या दरम्यान संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. तर मध्य रेल्वे उशीराने सुरु आहे.

बसचे मार्ग वळवले

रात्री पासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे बेस्ट बसचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. यामुळे नोकरदार वर्गाला याचा चांगलाच फटका बसणार आहे. विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला आहे.

First Published on: August 4, 2020 3:05 PM
Exit mobile version