मुंबईच्या महापौर सैफी रुग्णालयात दाखल

मुंबईच्या महापौर सैफी रुग्णालयात दाखल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सकाळपासून ताप असल्याने आणि अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. मात्र, सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु, त्यांना किडनी स्टोन असल्याचे समोर आले असल्याने त्यांना पुढील दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी करण्यात आली होती तपासणी

लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालय आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची यापूर्वी देखील अनेकदा तपासणी करण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी नर्स म्हणून काम केले आहे. मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी त्यांनी संवाद साधला होता. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या नर्सना प्रोत्साहन दिले. इतकेच नाही तर रुग्ण गायब प्रकरणात त्यांनी गंभीर दखल घेऊन, आवश्यक त्या कारवाईचे आदेश देखील दिले होते.


हेही वाचा – मुंबईत सात हजाराहून अधिक वाहने जप्त; मुंबई पोलिसांची माहिती


First Published on: June 29, 2020 2:40 PM
Exit mobile version