घरमुंबईमुंबईत सात हजाराहून अधिक वाहने जप्त; मुंबई पोलिसांची माहिती

मुंबईत सात हजाराहून अधिक वाहने जप्त; मुंबई पोलिसांची माहिती

Subscribe

मुंबईत काल म्हणजेच २८ जून रोजी सात हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त केल्याची माहिती पोलिसांनी ट्विटरद्वारे दिली आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे आहे की, २८ जून रोजी ७ हजाराहून अधिक नागरिकांनी औपचारिक तसेच वैद्यकीय कारण किंवा आपत्कालीन परिस्थिती नसताना वाहने बाहेर काढून टप्प्याटप्प्याने होत असलेल्या अनलॉकच्या नियमांचे उल्लंघन केले. शहर व्यवस्थितपणे अनलॉक करण्यासाठी मुंबईकर सर्व नियमांचे पालन करून आम्हाला साथ देतील, अशी आम्ही आशा करतो, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी जारी केली नियमावली 

राज्य सरकारने जारी केलेल्या मिशन बिगेन मार्गदर्शक तत्वानुसार शहराने विश्रांती देण्यास सुरूवात केली असल्याने नागरिकांनी वैयक्तिक सुरक्षा आणि सामाजिक अंतराचे निकष पाळण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी रविवारी केले. कोरोनाच्या संकटात मुंबईमध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढत असताना नागरिकांनी विनाकरण घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार पोलीस प्रशासन तसेच राज्य सरकारकडून केले जात आहे. मात्र तरीही अनेकदा मुंबईकर विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. या नवीन नियमावलीत पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यास वाहन जप्त केले जाईल, असे नमूद केले. तसेच पोलिसांनी दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यानुसार कालपासून कारवाई सुरूवात करण्यात आली आहे.

हे आहेत नवीन नियम –

  • अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडता येणार आहे.
  • बाहेर फिरताना मास्क घालणे बंधनकारक आहे
  • आपल्या घरापासूनच्या २ किमी अंतरापर्यंतच्याच दुकाने आणि सलूनमध्ये जाता येणार आहे. या अंतराच्या मर्यादेबाहेर जाण्यास परवानगी नाही.
  • व्यायाम किंवा वॉक घेण्यासाठीदेखील २ किमी अंतराच्या परिसरातच फिरता येणार आहे.
  • कार्यालय आणि दवाखान्यातही २ किमीच्या परिसरातच जाता येणार आहे.
  • सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक आहे.
  • या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल.

हेही वाचा –

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा; पश्चिम रेल्वेवर लोकलच्या ४० फेऱ्या वाढवल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -