‘जनता पाहतेय, योग्य वेळी आशीर्वाद देईल’ – जन आशीर्वाद यात्रेवर महापौरांची खोचक टीका

‘जनता पाहतेय, योग्य वेळी आशीर्वाद देईल’ – जन आशीर्वाद यात्रेवर महापौरांची खोचक टीका

भाजपच्या जन आर्शीवाद यात्रेवरुन (Jan Ashirwad Yatra) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपची खिल्ली उडवली होती. पुन्हा एकदा महापौरांनी भाजपवर निशाणा साधलाय. ‘भाजपची जन आशीर्वाद यात्रा ही फसवणुकीची यात्रा आहे. भाजप काय करत आहे याची लोक साक्ष देत आहे. ते योग्य वेळी त्यांचा आर्शीवाद देतील, अशी खोचक टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. ‘त्यांना खरोखर काम करायचे असे तर त्यांनी लोकांसाठी कोविड लस द्यावी’, असेही महापौर पुढे म्हणाल्या.  (mumbai mayor Kishori pednekar slam bjp over jan ashirwad yatra )

केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागलेल्या भाजपच्या चार मंत्र्यांची राज्यातील विविध भागात जन आर्शीवाद यात्रा सुरू होणार होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे १९ ऑगस्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृर्तीस्थळाला भेट देण्यासाठी येणार होते. मात्र त्या आधी ही जन आर्शीवाद यात्रा नाही तर ही जन छळवणूक यात्रा असल्याचे म्हणत महापौरांनी भाजपची चांगलीच खिल्ली उडवली होती. जनता भाजपला वैतागली आहे त्यामुळे जन आर्शीवाद मिळणार नाही, अशी टीका महापौरांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा महापौरांनी भाजपच्या जन आर्शीवाद यात्रेवर निशाणा साधल्याचे पहायला मिळाले.

शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृर्तीस्थळाचे शुद्धीकरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृर्ती स्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी स्मृर्तीस्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले. आधी गोमुत्र शिंपले आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृर्तीस्थळाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. या प्रकारानंतर शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटल्याचे पहायला मिळाले.

उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतील हे सर्वात उत्तम काम हे शुद्धीकरण करणे आहे. दुसरं ते काहीही करू शकत नाही,अशा शब्दात नारायण राणे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.


हेही वाचा – …अन्यथा पुन्हा पूर्ण लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

First Published on: August 22, 2021 4:47 PM
Exit mobile version