कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पालिकेचा ‘Action Plan’

कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पालिकेचा ‘Action Plan’

दिवसेंदिवस राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. Active रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून मृत्यूंचाही आकडा अधिकाअधिक वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका देखील सज्ज झाली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘Action Plan’ तयार केला आहे. यामध्ये येत्या ७ दिवसात १ हजार १०० कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच मुंबईत कोरोना संकट वाढत असल्याने मुंबई महापालिका हॉटेल्सचीही मदत घेणार आहेत. महापालिकेतर्फे हॉटेल्सची नावे जाहीर करण्यात येतील. त्यानुसार त्या यादीतील हॉटेलमध्ये रुग्ण वास्तव्य करु शकतील. यामुळे ज्या रुग्णांना खरच बेडची आवश्यकता आहे, अशा व्यक्तींना त्याठिकाणी हलवण्यात येण्यास मदत होईल. त्या हॉटेल्समध्ये कोविड सेंटरसारखे प्रशिक्षित डॉक्टर आणि इतर सुविधा असतील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

दोन शिफ्टमध्ये अधिकारी करणार काम

‘सध्या मुंबईत कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे मुंबई महापालिकेने कठोर पाऊले उचलली आहेत. याकरता महापालिकेकडून कृती कार्यक्रम तयार केला असून रुग्णांना बेड मिळण्यासाठी महापालिकेने कठोर कार्यपद्धती अमलात आणली आहे. आता प्रत्येक वार्डासाठी दोन नोडल अधिकारी असणार आहेत. हे अधिकारी आता दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते ७ यावेळेत ते काम पाहणार आहेत. त्यामुळे सांयकाळी ७ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णांना बेडसाठी वणवण करावी लागणार नाही. तसेच १९१६ वर कॉल केला असता, तो फोन व्यस्त सांगण्यात येतो. त्यामुळे आता प्रत्येक वॉर्डमधील वॉररुममध्येच फोन करावा. जेणेकरुन वॉररुम आणि नोडल अधिकारी बेड मिळवून देण्यासाठी मदत करतील, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

२४ तासांत अहवाल द्या

ज्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अशा व्यक्तींचा अहवाल २४ तासांत द्यावा. यामुळे त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीवर तात्काळ औषधोपचार करण्यास मदत होईल. तसेच महापालिकेने ३२५ अतिरिक्त आयसीयू बेड रुग्णालयांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण आयसीयू बेड्सची संख्या २ हजार ४६६ वर गेली आहे. तरी नागरिकांना स्वत:ला जपावे. दोन दिवस सण आले आहेत. त्यामुळे घरातच नागरिकांनी आनंदाने सण साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.


हेही वाचा – संचारबंदीत घराबाहेर फिरणाऱ्यांची केली अँटिजन टेस्टची शक्कल; थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी


 

First Published on: April 12, 2021 11:39 AM
Exit mobile version