मुंबई नाशिक महामार्गावर कोंबड्यांच्या टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर कोंबड्यांच्या टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर कोंबड्यांच्या टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

रविवारी असल्याने टेम्पोमध्ये कोंबड्या घेऊन नाशिककडून येणाऱ्या टेम्पोचा मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे,खारेगाव जवळ रविवारी सकाळी सुमारे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो चालक सलमान खान (३४) याच्यासह क्लिनर फिरोज खान (३२) या दोघांचा जागी मृत्यू झाला. या अपघातामुळे या महामार्गावरील ठाण्याकडे येणारी वाहतूक पाऊण तास खोळंबली होती. तर अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर जवळपास एक तासांनी वाहतुक सुरळीत होण्यास सुरुवात झाली.

सलमान हा फिरोज याच्यासह कोंबड्यांनी भरलेला टेम्पो घेऊन नाशिक हुन ठाण्यात येत होता. याचदरम्यान ठाण्यातील खारेगाव जवळ तो टेम्पो पुढे असणाऱ्या कंटेनरला जाऊन जोरात धडकला. ही ठोकर इतकी जोरात होती की टेम्पो चालकासह क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मिळताच, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग,कळवा पोलिस अधिकारी, कळवा वाहतूक पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम बचाव कार्य सुरू केले. मात्र दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

अपघातामुळे गाडीतील तेल रस्त्यावर सांडले होते. रस्त्या पाण्याने धुवण्यात आला. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतुक चांगलीच खोलंबली.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास एक तासांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली. त्यानंतर ठाण्याकडे येणारी वाहतुक सुरळीत झाली. यावेळी एक आपत्कालीन निविदा, दोन क्यूआरव्ही, एक क्रेन आणि हायड्रा वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.


हेही वाचा – अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव

First Published on: November 7, 2021 9:13 AM
Exit mobile version