पोलीस बंदोबस्त ६ डिसेंबरला मिळणार नाही!

पोलीस बंदोबस्त ६ डिसेंबरला मिळणार नाही!

६ डिसेंबर वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० सामना रंगणार आहे. मात्र आता हा सामना अडचणीत आला आहे. सामन्या दिवशी आवश्यक ते पोलीस बळ मिळणार नसल्याचे आयुक्तांनी एमसीएला स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे हा सामना होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. यादिवशी बाबरी मशीद तोडण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत कडेकोट बंदोबस्त असतो. तसंच ६ डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्वाण दिन देखील असतो. त्यामुळे या दिवशी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो.

सुरक्षारक्षक तैनैत होतील का ते बघा

शुक्रवारी यासंदर्भात बैठक होणार आहे. पोलिसांनी एमसीएल सामन्यासाठी खासगी सुरक्षारक्षक तैनैत होतील का ते बघा असं कळवलं आहे.


हेही वाचा – ‘गुलाबी’ अध्यायासाठी टीम इंडिया सज्ज!


 

First Published on: November 22, 2019 10:37 AM
Exit mobile version