मुंबईतील दोन पोलिसांचा कोरोनामुळे बळी

मुंबईतील दोन पोलिसांचा कोरोनामुळे बळी

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूने राज्यात आपला विळखा अधिक घट्ट केला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. या सगळ्या धावपळीच्या जीवनात मात्र, पोलिसांना देखील आता कोरोनाची बाधा होत असून बुधवारी दोन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार; सहार वाहतूक विभागातील सहायक फौजदार आणि हवालदार या दोघांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील दहा कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे. तर राज्यामध्ये मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १४ वर गेली आहे.

दोन पोलिसांचा मृत्यू

धारावीतील शाहूनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी वाहतूक विभागात कार्यरत असलेले आणि सध्या सहार येथे नेमणुकीला असलेले सहायक फौजदार यांचा मृत्यू झाला आहे. सर्दी, ताप आणि इतर लक्षणे असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. तर पार्क साईट पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेले हवालदार यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांचाही कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.


हेही वाचा – कोव्हिड वॉर्डात डॉक्टरच्या डोक्यावर पंखा पडला; नायरमधील घटना


First Published on: May 20, 2020 11:27 PM
Exit mobile version