मुंबई पोलिसांनाही ‘बेस्ट’चं तिकीट बंधनकारक; मोफत प्रवास होणार बंद

मुंबई पोलिसांनाही ‘बेस्ट’चं तिकीट बंधनकारक; मोफत प्रवास होणार बंद

मुंबईत आता बेस्टनं प्रवास करणाऱ्या पोलिसांनाही बसचं तिकीट बंधकारक होणार करण्यात येणार आहे. मुंबईत बेस्टच्या बसमधून पोलिसांचा मोफत बेस्ट प्रवास आता बंद होणार आहे. मुंबई पोलिसांना १ जूनपासून बेस्टच्या बसमधून प्रवास करायचा असल्यास पैसे देऊन तिकीट घ्यावे लागणार आहे.

बेस्टने पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मोफत पास देऊ नयेत, असे मुंबई पोलिसांनी बेस्ट प्रशासनाला कळवले आहे. या निर्णयामुळे पोलिस दलामध्ये नाराजीचे चित्र आहे.

मुंबई पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कर्तव्यावर हजर होताना, घरी जाताना किंवा अन्य काही कामासाठी बेस्टच्या बसमधून प्रवास करण्यासाठी पोलिसांना मोफत पास दिला जात होता.

या पासांबाबत बेस्ट प्रशासनाने बिले पाठविल्यानंतर पोलिस दलाकडून ही रक्कम अदा केली जात होती. मात्र १ जूनपासून ही कार्यपद्धत बंद करण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईतील पोलिसांना दैनंदिन कामकाजासाठी वाहने देण्यात आली आहेत.

बेस्ट बसचा मोफत प्रवास बंद करताना पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरसकट प्रवासखर्च मिळावा, यासाठी आयुक्तांनी वेतनामध्येच प्रवासभत्ता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा भत्ता नक्की किती असेल, हे समजू शकले नाही.


हेही वाचा – “हा फोटो सर्वकाही सांगून जातो हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसलं नाही” शालिनी ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

First Published on: May 15, 2022 3:15 PM
Exit mobile version