Mumbai Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासात बाधितांमध्ये घट; ५२९ नव्या रूग्णांचे निदान

Mumbai Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासात बाधितांमध्ये घट; ५२९ नव्या रूग्णांचे निदान

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात कोरोना संसर्ग अद्याप सुरू असला तरी मुंबई सारख्या मोठ्या शहरात प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरात संसर्ग कमी झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईत रविवारी ७०० कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली तर आज सोमवारी दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासात ५२९ नव्या रूग्णांचे नोंद करण्यात आली आहे. यासह मुंबईतील मृतांच्या संख्येत कोणताही बदल झाला नसून मृत संख्या तितकीच असून आज १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आज मुंबईत ५२९ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आल्याने आतापर्यंत ७ लाख १७ हजार १०८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ७२५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८४ हजार १०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५ हजार ५५० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच १५ हजार २०२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ६६ लाख ४० हजार ६४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आज दिवसभरात २० हजार १३३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील कोरोना मुक्तीचा दर ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ६७२ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या २१ दिवसांवर आली आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ११ रुग्ण पुरुष व ८ रुग्ण महिला होते. १३ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ६ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते.


Corona Vaccine: कोरोना विरोधी Novavax लस सर्व स्ट्रेनवर ९० टक्के प्रभावी!

First Published on: June 14, 2021 9:22 PM
Exit mobile version