घरदेश-विदेशCorona Vaccine: कोरोना विरोधी Novavax लस सर्व स्ट्रेनवर ९० टक्के प्रभावी!

Corona Vaccine: कोरोना विरोधी Novavax लस सर्व स्ट्रेनवर ९० टक्के प्रभावी!

Subscribe

अमेरिकेची नोव्हावॅक्स लस उत्पादक कंपनीने सोमवारी असे सांगितले की, त्यांची लस कोरोना विरूद्ध अत्यंत प्रभावी असून कोरोनाच्या सर्व स्ट्रेनच्या कोरोनव्हायरसपासून संरक्षण प्रदान करते. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये घेण्यात आलेल्या मोठ्या आणि कोरोना लसीच्या अंतिम टप्प्यातील अभ्यासामध्ये ही बाब समोर आली आहे. यावेळी कंपनीने त्यांची लस एकूण ९० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार, ती लस अंत्यत सुरक्षित आहे. नोव्हावॅक्स लस एका ठराविक रेफ्रिजरेटर तपमानावर ठेवली जाऊ शकते आणि त्याचे वितरण करणेही सोपे आहे. अमेरिकेत कोरोना विरोधी लसींची मागणी कमी झाली असली तरी जगभरात अजून लसींची गरज भासत आहे. नोव्हावॅक्स लस साठवणे आणि वाहतूक करण्यासही सोपे आहे आणि विकसनशील देशांना या लसीचा पुरवठा वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

सप्टेंबरच्या अखेरीस अमेरिका, युरोप आणि इतरत्र वापरण्यासाठी लस मंजूर करण्याची कंपनीची योजना असून ते महिन्यातून दहा कोटी डोस तयार करण्यास सक्षम असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नोव्हावॅक्सचे मुख्य कार्यकारी स्टॅन्ली एर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सुरूवातीच्या कोरोना लसींच्या उत्पादनापैकी बरेच डोस कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जाणार आहे.”

नोव्हावॅक्सच्या अभ्यासात अमेरिका आणि मेक्सिकोमधील १८ आणि त्याहून अधिक वयाच्या जवळपास ३० हजार लोकांचा सहभाग होता. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेल्या ब्रिटनमध्ये या विषाणूच्या अनेक प्रकारांवर ही लस प्रभावी ठरली. याव्यतिरिक्त, ही लस वृद्ध आणि आरोग्याच्या समस्या असलेल्यांसह जोखमीच्या गटांवर प्रभावी होती. तसेच या लसीचे साइड इफेक्ट्स बहुधा किरकोळ होते आणि इंजेक्शन देण्यात आलेल्या जागेवर वेदना होते. रक्ताच्या गुठळ्या किंवा हृदयाची कोणतीही समस्या आढळली नाही.


विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला चीटिंग करून हरवले; Zerodha च्या संस्थापकावर बंदी
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -