मुंबई, ठाण्यात दोन दिवस पावसाचा अलर्ट!

मुंबई, ठाण्यात दोन दिवस पावसाचा अलर्ट!

फोटो सौजन्य - फर्स्ट पोस्ट

येत्या दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. मुख्यत्वेकरून मुंबई आणि ठाणे या भागात पावसाचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अहमदनगर, पुणे, सातारा यासारख्या भागातही गेल्या काही तासांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. हवामान विभागाने या भागासाठी पावसाचा अंदाज मांडला होता. त्याआधी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, सातारा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर, रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडेल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मांडला होता. हा परतीचा पाऊस असून यापुढच्या काळात मॉन्सून परतण्याची सुरूवात होईल असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले. मुंबई तसेच ठाणे परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


 

First Published on: October 13, 2020 1:36 PM
Exit mobile version