मुंबई विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलून जाणार!

मुंबई विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलून जाणार!

मुंबई विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलून जाणार!

मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत आणि परिसराचे मूळ कलात्मक (हेरिटेज) सौंदर्य पूर्ववत जतन करून तेथील निसर्गसंपदा वृद्धींगत करण्यात येणार आहे. त्यासाठी दोनशे कोटींचा निधी चार वर्षात टप्प्याटप्याने उपलब्ध करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी जाहीर केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठाला १६० वर्षांचा ऐतिहासिक आणि गौरवशाली वारसा आहे. विद्यापीठाच्या इमारतीच सौंदर्य आणि परिसराला जागतिक वारशाच महत्व आहे. मुंबई शहर आणि शहरातील इमारतीच सौंदर्य खुलवण्याच्या दृष्टीने विद्यापीठ इमारत आणि परिसराला मूळ सौंदर्य बहाल करून तेथे शिकणाऱ्या व भेट देणाऱ्या नागरिकांना आनंददायी वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी रुपये देण्यात येणार

या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. या निर्णयांतर्गत यावर्षी पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ आणि एमएमआरडीए यांच्या समन्वयातून यासंदर्भातील आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी होणार आहे. फोर्ट कॅम्पसप्रमाणे विद्यापीठाच्या कलिना येथील इमारतींची सौंदर्यवृद्धी, परिसराची स्वच्छता, वृक्षलागवड, अतिक्रमण निर्मूलन, शैक्षणिक सुविधांचा विकास आदींबाबतही बैठकीत चर्चा झाली. कलिना तसेच राज्यातील विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच शैक्षणिक सुविधा विकसित करण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आले.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचा मागील आठवड्यात आढावा घेतला असता विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना डिजीटल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.


हेही वाचा – आता मेट्रोचा अनलिमिटेड प्रवास फक्त २५ रुपयांच्या टॉप अपमध्ये!


 

First Published on: January 22, 2020 9:46 PM
Exit mobile version