कांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणात ८ जणांना अटक; आतापर्यंत १२ लाख ४० हजार जप्त

कांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणात ८ जणांना अटक; आतापर्यंत १२ लाख ४० हजार जप्त

कांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणात ८ जणांना अटक; आतापर्यंत १२ लाख ४० हजार जप्त

बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याच प्रकरणी राज्याचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ४० हजार रोख जप्त केली असल्याची माहिती दिली. तसेच या बोगस लसीकरणासंदर्भात चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन केल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरण उघडकीस आले. यात कांदिवलीतील बोगस लसीकरण मोहीम उजेडात आली. माहितीनुसार, या बोगस लसीकरणाच्या माध्यमातून मुंबईतील जवळपास २ हजार ५३ नागरिकांना बनावट लस देत फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. मुंबईतील कांदिवली, वर्सोवा, खार, बोरिवली अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी बनावट लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. एकाच टीममधील या बोगस लोकांनी मुंबईतील इतर ९ वेगवेगळ्या ठिकाणीही लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. ‘आतापर्यंत बोगस लसीकरणप्रकरणी ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावर पोलिसांनी अतिशय कठोर कमलांची अंमलबजावणी केली आहे,’ असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या बोगस लसीकरणप्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत १२ लाख ४० हजार रक्कम त्यांच्याकडून जप्त केली आहे. हे लसीकरण ज्या कारच्या माध्यमातून होत होते, ती टोयोटा कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणातील दोन मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनिष त्रिपाठी या दोघांची बँकची खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच डॉ. पठारिया, मिसेस पठारिया यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात २०० व्यक्तीचे जबाब नोंदवण्यात आले असून या गुन्हातील ३९० पैकी ३१४ लोकांचे बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आले आहे. या अनुषंगाने तपास केल्यानंतर त्याचा अभ्यास करून, आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

First Published on: June 25, 2021 1:38 PM
Exit mobile version