पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबईत; पोलीस अलर्ट मोडवर तर, ‘या’ गोष्टींवर असेल बंदी

पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबईत; पोलीस अलर्ट मोडवर तर, ‘या’ गोष्टींवर असेल बंदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी येत्या 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असून, मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. (Mumbai Vande Bharat launch by PM Modi on Feb 10 prohibitory orders issued details)

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये मुंबई पोलिसांनी मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी येथे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या ठिकाणी ड्रोन आणि इतर गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.

कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मुंबई पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहेत.

मुंबईहून लवकरच दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार असून, एक वंदे भारत ट्रेन मुंबई-सोलापूर मार्गावर तर, दुसरी मुंबई-शिर्डी मार्रगावर धावणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.

ट्रिपल इंजिन सरकार लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील महिन्यात म्हणजेच 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात मोदींनी मुंबईतील अनेक प्रकल्पांचे उद्धाटन केले. तसेच, “मुंबई हे देशाचे हृदय आहे. मुंबईच्या विकासात महापालिकेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत विकासाला समर्पित असणारे लोक असतील तर मुंबईचा विकास अधिक गतीने होईल. मुंबईच्या विकासासाठी महापालिकेसह ट्रिपल इंजिन सरकार लागणार आहे”, अशी साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना घातली होती.


हेही वाचा – केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे गरिबांवर ‘सायलेंट स्ट्राइक’; सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका

First Published on: February 6, 2023 4:14 PM
Exit mobile version