Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो घराच्या बाहेर पडताय? मग ही बातमी वाचाच…

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो घराच्या बाहेर पडताय? मग ही बातमी वाचाच…

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाल्बॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (ता. 14 मे) रविवारी मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते 3.15 या वेळेत अभियांत्रिकी काम चालणार आहे. या कारणामुळे सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद लोकलला माटुंगा ते मुलुंडदरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरही काही ठिकाणी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – Karnataka Election 2023: ‘या’ कारणांमुळे कर्नाटकात काँग्रेसला मिळाला ऐतिहासिक विजय

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यापुढील सर्व जलद लोकल मुलुंडपासून जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी-वांद्रे मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4.11 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे विरार, वसई ते बोरीवलीपर्यंत दोन्ही मार्गांवर लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येतील. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कालावधीत सर्व अप जलद लोकल ठाण्यापासून मुलुंड, भांडूप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबवण्यात येतील. यामुळे सीएसटीकडे ये-जा करणाऱ्या सर्व लोकल किमान 10 मिनिटे उशीराने धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल सेवा सकाळी 11.34 ते सायं.4.47 पर्यंत आणि वांद्रे, अंधेरी, गोरेगावपर्यंतची सेवा सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 पर्यंत खंडित केली जाणार आहे. तर पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटीपर्यंतची सेवा सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 आणि वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 पर्यंत लोकल बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पनवेल आणि कुर्ला या रेल्वे स्थानकांतून काही विशेष लोकल चालवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हार्बर रेल्वे
पनवेल – वाशी अप आणि डाऊन हार्बर लाइन्सवर (सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 ) मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईहून सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणार्‍या हार्बर मार्गावरील सेवा रद्द मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत.

ट्रान्स – हार्बर लाइन
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी,नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरीय गाड्या सीएसएमटी मुंबई-वाशी सेक्शनवर धावतील.

उरण लाइन
बेलापूर – नेरुळ – खारकोपर सेवा सुरु राहणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर- नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

First Published on: May 14, 2023 9:59 AM
Exit mobile version