‘माझे पती आत्महत्या करुच शकत नाहीत’, मनसुख हिरेनच्या पत्नीची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया

‘माझे पती आत्महत्या करुच शकत नाहीत’, मनसुख हिरेनच्या पत्नीची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया

'माझे पती आत्महत्या करुच शकत नाहीत', मनसुख हिरेनच्या पत्नीची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया

मनसुख हिरेन यांच्या पत्नींने पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांना भेटायला जातो असे सांगून मनसुद हिरेन घरी परत आलेच नाहीत. त्यांना कांदीवलीच्या तावडे यांचा फोन आला होता. तावडे हे क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचा संशय आहे. मनसुख यांना तावडे यांचा शेवटचा फोन आला होता. आम्ही रात्रभर त्यांची वाट पाहत होतो मात्र ते घरी परत आले नाहीत, असे मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांना सांगितले. माझ्या कुटुंबियांसोबत असे काही होऊ शकते असा विचारही मी कधी करु शकत नाही. माझे पती आत्महत्या करुच शकत नाहीत,अशा भावना विमल हिरेन यांनी व्यक्त केल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, माझ्या पतीच्या मृत्यूमागचे सत्य समोर यायला हवे अशी मागणी विमल हिरेन यांनी केली आहे.

आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याबाबत आम्ही पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. माझ्या पतीला चौकशीसाठी वारंवार बोलवले जात होते. त्यांना पूर्णवेळ बसवून ठेवले गेले होते. तरी माझ्या पतीने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. गुरुवारी त्यांना रात्री पोलिसांनी बोलावून घेतले. रात्री दहा नंतर त्यांना तावडे नामक व्यक्तीचा फोन आला आणि ते बाहेर गेले. सकाळीही ते परत आले नाहीत. म्हणून आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली अशी माहिती विमल हिरेन यांनी दिली.

हिरेन परिवारात कोणत्याच अडचणी नव्हत्या. हिरेन हे खुप चांगल्या कुटुंबातील आहेत. त्याचबरोबर मनसुख हे उत्तम स्विमर होते त्यांचा बुडून मृत्यू होऊच शकत नाही. पोलीस त्यांना सतत चौकशीसाठी बोलावत होते. तेव्हाही त्यांना कधी मानसिक त्रास झाला नाही असा माणूस आत्महत्या करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया मनसुख यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे. चांगल्या परिवाराची बदनामी करु नका, त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो कारचे मालक मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी संशयास्पद मृत्यू झाला. मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर रोड येथील खाडीत सापडला. शुक्रवारी सकाळी १०: २५ वाजता त्यांच्या मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला.

कांदिवली ब्रांचची ‘तावडे’ नावाची व्यक्ती कोण?

मनसुख हिरेल यांच्या मृत्यूचा तपास ATS कडे सोपवण्यात आला आहे. मात्र हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख यांना शेवटचा फोन हा तावडे नावाच्या व्यक्तीचा आला आहे. तावडे नावाची व्यक्ती ही कांदिवली क्राईम ब्रांचची अधिकारी असल्याचा संशय आहे. मात्र आत ही तावडे नावाची व्यक्ती कोण याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 


हेही वाचा – अंबानी स्फोटक प्रकरण: स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू; सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया

First Published on: March 5, 2021 9:26 PM
Exit mobile version