नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत – अस्लम शेख

नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत – अस्लम शेख

मुंबईलचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी आमदार अमिन पटेल उपस्थित होते.

मुंबईतील नागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत एकुण २ जण जखमी झाले असून एका ७० वर्षांच्या वृद्धेसह १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे.

घटनेबद्दल माहिती मिळताच मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवड्याभरात घेण्याची ग्वाही ना. शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सविस्तर बातमी वाचा – महाडपाठोपाठ मुंबईतही इमारत दुर्घटना

मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत काॅंग्रेस आमदार अमिन पटेल व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

First Published on: August 27, 2020 9:10 PM
Exit mobile version