मेट्रो- ३ च्या राडारोड्याची नवी मुंबईत विल्हेवाट

मेट्रो- ३ च्या राडारोड्याची नवी मुंबईत विल्हेवाट

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पातून भुयारीकरणाच्या कामात आतापर्यंत ५२ लाख ६४ हजार ९४७ क्युबिक मीटर इतक्या मोठ्या प्रमाणात राडारोडा तयार झाला आहे. पण वेळोवेळी या राडारोड्यातील विल्हेवाट ही मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच मुंबई महानगर प्रदेशात या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. बहुतांश राडारोडा हा नवी मुंबईतील परिसरातच विल्हेवाट लावण्यात आला आहे.

कुलाबा वांद्रे सिप्झ या मार्गावर आतापर्यंत भुयारी मार्ग तसेच स्टेशनच्या ठिकाणी झालेल्या खोदकामात राडारोडा तयार झाला आहे. भुयारासाठी झालेल्या खोदकामात एकूण ७ पॅकेजमधून तर ७ पॅकेजमधील स्टेशनच्या भागातून हा राडारोडा तयार झाला आहे. पॅकेज १ मधील टनेलमधून तयार झालेला राडारोड्याची मुंबईसह नवी मुंबईतही विल्हेवाट लावण्यात आली आहे. दास्तान फाटा ते जवाहरलाल नेहरू पोर्ट या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी हा राडारोडा वापण्यात आला आहे. पण संपूर्ण मेट्रो ३ प्रकल्पादरम्यान तयार झालेला राडारोडा हा मुख्यत्वेकरून भरावासाठी वापरण्यात येत आहे. तर काही ठिकाणी स्टेशन परिसरातच स्टेशनच्या सभोवतालची भिंत बांधण्यासाठी तसेच स्टेशनचे प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी याचा वापर करण्यात आला आहे.

राडारोड्यात बेसाल्टचा समावेश

राडारोड्यात महत्वाचा दगड हा काळ्या रंगाचा बेसाल्ट आहे. मुंबईतील पेट्रोलियम गोडाऊन, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मंडाला कारशेड याठिकाणी हा राडारोडा वापरण्यात आला आहे. बेलापूर गव्हाणफाटा, उरण, चिरले, माणकोली, दापोडे, सेझ गव्हाणफाटा, धापोडे, उल्वे, कुंदेलवाला याठिकाणी नवी मुंबईत या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. साधारणपणे एखाद्या टनेलच्या खोदकामात निघालेला राडारोडा हा केमिकलसोबत पुनर्वापरात येत नाही.

First Published on: December 12, 2019 5:08 AM
Exit mobile version