‘त्या’ ठिकाणी सोनं लपवून आणलं मुंबईत, NCB ने तीन महिलांना केली अटक

‘त्या’ ठिकाणी सोनं लपवून आणलं मुंबईत, NCB ने तीन महिलांना केली अटक

'त्या' ठिकाणी सोनं लपवून आणलं मुंबईत, NCB ने तीन महिलांना केली अटक

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB)  मोठ्या कारवाई सुरू आहेत. आजही NCB ने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानताळावर  ड्रग्ज आणणाऱ्या केनियातील तीन महिलांना अटक केली आहे. ड्रग्जसोबतच या तीन महिलांनी सोन्याची तस्करी देखील केली होती विशेष म्हणजेच त्यांनी हे सोने कोणत्याही बॅग मधून लपवून न आणता आपल्या गुप्तांगात लपवून आणले होते.  (NCB arrested three women for smuggling gold in mumbai international airport) ताब्यात घेण्यात आलेल्या तिघी ड्रग्स तस्कर नसून सोन तस्कर असल्याचे कळल्यानंतर एनसीबीने या तिघींचा ताबा हवाई गुप्तचर विभाग (कस्टम) यांच्याकडे दिला आहे.


NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केनियातील महिला ड्रग्जची तस्करी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने मुंबई विमानतळावर पाळत ठेवून सापळा रचला. त्यानुसार, दोहा येथील तीन महिला मुंबई विमानतळावर आल्या. NCB ने रचलेल्या सापळ्यानुसार तीन महिला NCB च्या ताब्यात आल्या. मोहम्मद खुरेशी अली (६१), अब्दुल्लाहि अब्दीया अदान (४३) आणि अली सादिया अल्लो (४५) असे अटक करण्यात आलेल्या सोन तस्कर महिलांचे नावे आहेत.

तीन महिला आरोपींना NCB ने अटक केल्यानंतर काही वेळाने तिन्ही महिलांनी त्यांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे NCB ने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांच्या तपासणीवेळी महिलांनी त्यांच्या गुप्तागांत काही वस्तू लपवल्याचे सांगितले.

त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने महिलांच्या गुप्तांगामधील वस्तू बाहेर काढण्यात आल्या.  महिलांनी त्यांच्या गुप्तागांत सोने लपवल्याची धक्कादायक बाब समोर आली. NCB ने महिलांकडून ९३८ ग्राम सोने जप्त केले. एकूण १३ पाकिटात १० ते १०० ग्रामचे १७ तुकडे लपवण्यात आल्याची माहिती NCB कडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – अजिंक्य देव यांच्या घरी चोरी प्रकरणात मोलकरणीची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता

First Published on: August 19, 2021 7:20 PM
Exit mobile version